टीम अण्णावर अंबिका सोनी यांनी वापरले टीकेचे शस्त्र

टीम अण्णावर अंबिका सोनी यांनी वापरले टीकेचे शस्त्र

टीम अण्णा अंबिका सोनी

टीम अण्णाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यावर कोळसा गैरव्यवहाराचे आरोप केल्यामुळे सरकार त्यांच्या विरुद्ध आक्रमक झाली आहे. जनतेमध्ये लोकशाही संस्था आणि पंतप्रधांवरील असलेला विशवास संपुष्टात आणण्यासाठी ‘टीम अण्णा’ ही मोहीम राबवीत आहे व हे सर्व ते प्रकाशझोतात राहण्यासाठी करीत आहे. आज केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांनी ‘टीम अण्णा’ मधील सर्व मतभेद उघड झाल्याची टीका केली आहे.

‘व्यक्तिगत पातळीवर पंतप्रधानांवर अण्णांची सहमती नसतानाही आरोप करून त्यांना लक्ष्य केले जात आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये सरकार, लोकशाही संस्था, पंतप्रधान कार्यालय यांच्याबद्दल द्विधावस्था वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. अण्णांचे निकटवर्तीय यात सहभागी आहेत. ज्या कंपूत तीव्र फाटाफूट आहे, त्याला ‘टीम अण्णा’ म्हणावे काय,’ असा टीकात्मक प्रश्न त्यांनी केला.

पंतप्रधानांवर अण्णांच्या सहकाऱ्यांनी ‘कॅग’च्या अहवालातील मुद्यांच्या आधारे गैरव्यवहाराचे आरोप केले. ‘कॅग’ मसुद्याचा हवाला देऊन आरोप केले जात आहेत. ‘टीम अण्णा’ आरोप करुन प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करीत आहे. पुरावे असल्यास न्यायालयात जावे, असे म्हणून अंबिका सोनी यांनी ‘टीम अण्णा’ला खुले आव्हान दिले आहे. सरकारचा भ्रष्टाचारविरोधातील लढाईला पूर्ण पाठिंबा आहे, असे सोनी यांनी स्पष्ट केले.