आंब्याचे पीठ

कृतीः

घट्ट व ताज्या कैऱ्यांच्या साली काढून त्या किसाव्या. नंतर तो कीस उन्हात वाळत टाकावा. चांगले वाळल्यावर ता किस दळून पीठ करून बाटलीत भरून ठेवावे. पदार्थामध्ये ही पूड उपयोगात पडते. ती पुष्कळ दिवस टिकते.