आंब्याच्या रसाची सांदणे

कुठल्याही आंब्याच्या रसाची सांदणे करता येतात. रसाच्या आंबटपणावर साखरचे प्रमाण कमीजास्त करावे लागते. पण शक्यतो गोड रसाचीच सांदणे करावी. कारण सांदणात साखर किंवा गूळ जास्त घातल्यास सांदणे हलकी न होता जड होतात.

साहित्य :

  • २ वाट्या आंब्याचा गाळलेला रस
  • १ साठी तांदळाचा रवा
  • अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ किंवा साखर
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • १ वाटी पाणी
  • २ वेलदोड्याची पूड
  • एक-अष्टमांश खायचा सोडा
  • अर्धा चमचा मीठ.