अमृत दही

मात्रा:

  • ४ माणसांसाठी

साहित्य:

  • ५०० ग्रॅम दही
  • २० ग्रॅम आले
  • १० ग्रॅम मंगो पल्प
  • ५ ग्रॅम छोटी वेलची पावडर
  • २५० मि.ली. दूध
  • २० ग्रॅम साखर
  • ३॥ ग्रॅम केसर
  • १० ग्रॅम पिस्ता

कृती:

दही एका मलमलच्या कपड्यात बांधून टांगून ठेवा. पाणी निथरून दही अर्धे राहिल्यावर काढून घ्या. आले सोलून बारीक कापा, मिक्सरमध्ये १५ मि.ली. पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट कापडाने गाळून कपात रस काढून घ्या. १० मि.ली. रस घ्या, दूध उकळून बाजूला ठेवा. ३० मि.ली. दूध वेगळे काढून ठेवा. त्यात केसर विरघळून ठेवा. बाकी दूधात साखर मिसळून थंड ठेवा. पिस्ता बारीक कापून ठेवा. दही एका भांड्यात फेटा. त्यात आल्याचा रस, आंबाचा पल्प, वेलची पावडर, नीट मिसळा साखरेचे दूध मिसळा व केसर मिसळून नीट हलवा. मिश्रण चार भागात वाटून फ्रीजमध्ये ठेवा. थंड होऊ द्या. वाढतांना वरून पिस्ता टाकून सर्व करा.