अननसाचे सरबत

साहित्य :

  • १ अननस
  • १ लिंबाचा रस
  • १ लि.पाणी
  • २ किलो साखर
  • पाऊण चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • पाव चमचा लेमन यलो कलर
  • अर्धा चमचा पायनॅपल इसेंस
  • अर्धा चमचा पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड

कृती :

प्रथम अननस किसावा व फडक्यातून पिळून घ्यावा. म्हणजे रस मिळेल. १ लिंबाचा रस,२ किलो साखर,१ लि.पाणी, अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड एकत्र करावे. गॅसवर एक उकळी येईपर्यंत उकळवावे व ढवळत राहावे. पाक तयार झाल्यावर तो गरम असतानाच त्यात पायनॅपलचा रस एकत्र करावा व ते मिश्रण
थंड झाल्यावर त्यात इसेंस व रंग टाकावा. सरबत देताना पाव भाग मिश्रण सरबत व पाऊण भाग पाणी ग्लासमध्ये एकत्र करावे. आवडत असल्यास मीठ टाकावे. बर्फ घालावा.