अनर्थ

आपल्या पुस्तकातील एका कवितेचे पान पुढे धरीत कविवर्य नारायण सुर्व्यांच्या चिरंजीवानी, रवींद्र सुर्वेने मागणी केली, “हे पहा, तुमच्या कविता आम्हला अभ्यासाव्या लागतात. तुम्हीच ही कविता शिकवा मला,”

“नको, बुवा, या कवितेचा अर्थ तू आपल्या शिक्षकांनाच विचार,” नारायण सुर्वे म्हणाले.

“पण ही कविता तुम्ही शिकविली तर’

‘अरे, ही कविता मी शिकविली तर अर्थ चुकेल अन्‌ शून्य मार्क मिळतील तुला,” नारायण सुर्वे त्याला समाजावित म्हणाले!