खुशाल तुरुंगात टाका

डॉ. मनमोहन सिंह

डॉ. मनमोहन सिंह
व्यंगचित्र: हर्षद खंदारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना प्रतिआव्हान केले आहे की, मी आणि माझी टीम जर भ्रष्टाचारी आणि देशद्रोही असेल, तर आम्हाला खुशाल तुरुंगात टाका. अण्णांनी अशीही मागणी त्यांच्याकडे केली आहे की परदेशी देणग्यांवर लोकपालासाठीची चळवळ सुरु आहे, या आरोपाचे पुरावे त्यांनी द्यावे.

हे खूप मोठे दुर्दैव आहे की लोकपालाच्या चळवळीला देशद्रोही चळवळ म्हटले जात आहे आणि हे आरोप पंतप्रधान कार्यालय करत असल्यामुळे ते गंभीर आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.