अनुज बिडवेच्या हत्येची कबुली

अनुज बिडवे

अनुज बिडवे

किआरान स्टेपल्टन याने भारतीय विद्यार्थी अनुज बिडवे याच्या हत्येची कबुली दिली. अनुजचे पालक पुण्याहून मँचेस्टर कोर्टात सुरु असलेल्या अनुजच्या हत्येची सुनावणी ऐकण्यासाठी येथे आले आहेत. तत्पूर्वी स्टेपल्टनने स्वतःला मानसिक रोगी असल्याचे जानेवारीत झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले व बिडवेच्या हत्येची कबुली दिली. पण आरोपी स्टेपल्टनने या प्रकरणात आपण दोषी नसल्याची याचिका कोर्टात दाखल केली. ती याचिका न्यायालयाने अमान्य केली असून, २५ जून पासून या खटल्याची सुरुवात होणार आहे.

आम्ही भारतातून ब्रिटनला किआरानच्या याचिकेवरील सुनावणी ऐकण्यासाठी आलो असून, ही सुनावणी आमच्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे बिडवे कुटुंबियांनी सांगितले. हा क्षण आमच्यासाठी भावनिक आणि खूप कठीण जात आहे कारण अनुजची हत्या करणार्‍या स्टेपल्टनला आम्ही प्रथमच पहातोय, असे त्यांनी नमूद केले. स्टेपल्टनच्या चेहेर्‍यावर संपूर्ण सुनावणीदरम्यान कोणतेही हावभाव नव्हते.