अग्निप्रलयात महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

मुंबई मंत्रालय

मुंबई मंत्रालय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांचीच कार्यालये कालच्या अग्निप्रलयात जळाली असल्याने अनेक वादग्रस्त घोटाळ्यांची, चौकशी संबंधित महत्त्वाच्या फायली त्या आगीत जळून खाक झाली आहेत. सीबीआयकडे आदर्श घोटाळ्याच्या फायली असल्यामुळे त्या वाचल्या आहेत पण तरीही यूएलसी घोटाळ्याच्या फायलींची राखरांगोळी झाली आहे.

या अग्निप्रलयात फायली जळून खाक झाल्या कारण चौथ्या मजल्यावरील नगरविकास विभागालगत असलेल्या माहिती तंत्रज्ञान खात्याची सर्व्हर केबिनमध्ये स्पार्क झाला. वायूसारखी ती आग लगतच्या नगरविकास विभागात पसरली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्र्यांची कार्यालये सहाव्या मजल्यावर आहेत. राज्याची महत्त्वाची धोरणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या, तसेच विभागीय चौकशी, महत्त्वाच्या योजना, विकास योजनांचे अहवाल, अनेक गोपनीय कागदपत्रे, मंजुरीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे, अशा सुमारे दोन हजारांहून अधिक फायली आणि कागदपत्रे जळाली.