आवळा पेठा

साहित्य:

  • आवळे
  • साखर

कृती:

आवळे पाणी न घालता प्रेशरकुकरमध्ये ठेवून ३ शिट्टय़ा करणे. थंड झाल्यावर पाकळ्या मोकळ्या करणे. फोडींच्या दुप्पट साखर मोजून बाजूला ठेवणे. त्यापैकी अर्धी साखर आणि फोडी एकत्र करून तीन/चार दिवस ठेवाव्यात. दिवसातून तीन/चार वेळा हलवावे. चाळणीवर फोडी घालून निथळून घेऊन उरलेली साखर घालून परत तीन दिवस ठेवणे. तीन/चार वेळा दिवसातून हलवणे. चौथ्या दिवशी परत चाळणीवर निथळणे. दोन/तीन तासांनी उन्हात वाळवावा. आवळा पेठा तयार.

दोन्ही वेळचे निथळलेले पाणी आणि थोडी साखर यांना उकळी आणणे. आवळा सरबत तयार. सरबतात थंड पाणी व किंचित मीठ घालून घेणे.