रामदेवबाबा-अण्णा यांची सरकारविरुद्ध एकजूट

रामदेवबाबा-अण्णा यांची सरकारविरुद्ध एकजूट

योगगुरु रामदेवबाबा यांनी ‘टीम अण्णा’च्या साथीने काळ्या पैशांच्या मुद्यावर लाक्षणिक उपोषण करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रामदेवबाबांनी येत्या नऊ ऑगस्टपासून (क्रांतिदिन) देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सर्व पक्षांना काळा पैसा परत आणण्यासाठी भेटणार आसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता समविचारी लोकांनी एकत्र यावे व लढायला सुरुवात करावी, अशी अण्णांनी राजघटावर घोषणा करून रमदेवबाबांना पाठिंबा दिला. रामदेवबाबांच्या व्यासपीठावर अण्णांसह सर्व टीमने हजेरी लावली.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह आणि पंधरा केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अरविंद केजरीवाल यांनी पुनरुच्चार केला. या सर्वांची विशेष तपास पथक नेमून चौकशी केली जावी, अशीही मागणीही त्यांनी केली. केजरीवाल यांनी ठरले नसतांनाही मंत्र्यांची नावे घेतली. यावर रामदेवबाबांनी त्यांना आवश्यक त्याच मुद्यांवर बोलण्याची समज दिली. या वक्तव्यामुळे त्यांच्यात मतभेद वाढल्याची चर्चा रंगू लागली. गोंधळ आणखीनच वाढला जेव्हा केजरीवाल व्यासपीठावरून उठून निघून गेले. यावर रमदेवबाबांनी असा खुलासा केला की, केजरीवाल यांना सकाळपासून बरे वाटत नव्हते व निघण्यापूर्वी माझी आणि आण्णांची परवानगी घेऊनच ते सभास्थळावरून उठले. अण्णा व रामदेवबाबांनी मिठी मारून ‘एकजूट’ असल्याचा दावा केला.

सर्व राजकीय पक्षांना पाठिंब्यासाठी पत्र लिहिले आहे. रामदेवबाबांनी सांगितले की ते कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, शरद यादव, मुलायमसिंह यांना भेटणार आहेत. पंतप्रधानांना देशभरात सहा लाखांहून अधिक ग्रामसित्या काळा पैसा परत आणण्याची विनंती करणारे ग्रामसभाचे ठराव पाठविणार आहेत. रामदेवबाबांनी कार्यवाही न झाल्यास नऊ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात करु, असा इशारा दिला.

तत्पूर्वी, आंदोलनाला दहाच्या सुमारास प्रारंभ झाला. राजघटावर अण्णा आणि रामदेवबाबांनी उपोषणापूर्वी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले.