बाळ ठाकरे यांची प्रकृती प्रगतिपथावर

बाळ ठाकरे

बाळ ठाकरे

लीलावती हॉस्पिटलच्या डोक्टरांनी माहिती दिली की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे व त्यांच्या आणखी दोन तपासण्या झाल्यानंतर उपचारांची दिशा स्पष्ट करण्यात येईल.

ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट अफवा पसरल्या जात आहेत पण त्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

शिवसेनाप्रमुख यांच्या प्रकृतीकडे डॉक्टर कायम लक्ष ठेवून आहेत आणि यात काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.