बालुशाही

साहित्य :

  • ४ वाट्या मैदा
  • अर्धी वाटी डाळीचे पीठ
  • १ वाटी तूप
  • अडीच वाट्या साखर
  • ५-६ वेलदोड्यंची पूड
  • तळण्यासाठी तूप.

कृती :

तूप गरमकरून घ्यावे.दोन्ही पिठे एकत्र करूनत्यात तुपाचे मोहन घालावे.नंतर पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे.साखरेत पाणी घालून दोनतारी पाक करावा. त्यात वेलदोड्याची पूड घालावी.वरील पिठाच्या मोठ्या पेढ्याएवढ्या गोळ्या कराव्या. दोन्ही हातात दाबून जरा चपट्या कराव्या.तूप तापवून कडई खाली घ्यावी. त्यात वरील तयार केलेले थोडेसे गोळे सोडावे कढई हलवत राहावे. बुडबुडे येण्याचे थांबल की कढईतील बालुशाही झाऱ्याने बाहेर काढावी. तूप पुनः तापवून खाली घ्यावे व वरीलप्रमाणे करावे. नंतर चांगला बदामी रंग आला की कढईतून काढून पाकात टाकावे. दुसरा घाणा झाला की पहिले बालुशाही पाकातून बाहेर काढावे.