बनाना सरबत

साहित्य :

  • ४ पिकलेली केळी
  • ४ ग्लास दूध
  • १ चमचा मध
  • १ टी स्पून जायफळ पावडर
  • १ कप व्हॅनिला आईस्क्रीम
  • वेलदोडा पावडर

कृती :

केळी, दूध, मध, आईस्क्रीम ज्युसरमधून काढावे व चार ग्लासात ओतून त्यावर जायफळ व वेलदोडा पावडर घालून सजवावे. हे सरबत लगेचच संपवावे.