बासुंदी

साहित्य :

  • दूध
  • साखर
  • वेलदोड्याची पूड
  • केशर
  • चारोळी
  • बदाम
  • पिस्त्याचे काप.

कृती :

प्रथम दूध तापवावे. नंतर स्तोव्हवर पितळेची परात किंवा लगडी पातेले ठेवावे.त्यात २ ते २॥ कप दूध घालून स्टीलच्या उलथन्याने हलवत रहावे. दाट झाले की दुसऱ्या पातेल्यात काढावे. असे सर्व दूध आटवावे. नंतर त्यात बेताचे गोड होईल इतपत साखर घालावी. गॅसवर ठेवून साखर विरघळवावी. वेलदोड्याची पूड घाला. थोडी केशराची पूड, बदाम-पिस्त्याचे काप व खरंगटलेली चारोळी घाला. बासुंदी खाताना गार असावी. बासूंदीला दाटपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की, १ चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे दूध मिसळून ते बासुंदीत घाल. एक-दोन उकळ्या आल्या की उतरा. एक चमचा कॉर्नफ्लोअर लावल्याने चवीत काहीही फरक पडत नाही.

1 thought on “बासुंदी

Comments are closed.