बटाटा आणि साबुदाणा चकल्या

साहित्य :

  • उकडून किसलेले बटाटे एक वाटी
  • साबुदाणा एक कप
  • चवीनुसार तिखट
  • मीठ

कृती :

निवडलेला साबुदाणा चार तास चांगला भिजवून घ्या. एका परातीत भिजलेला साबुदाण, बटाटा, कीस, तिखट, मीठ घ्या. चांगले एकजीव मळा, अधून मधून पाण्याचा हात लावा. चांगला मऊसर गोळा झाला की चकलीचा सोऱ्याने चकल्या करा. प्लॅस्टीकच्या कागदावर चांगल्या कडकडीत वाळवा. जरुरीप्रमाणे तळून खा.