बटाटा पोहे

साहित्य:

  • २ कप पोहे
  • १ बटाटा
  • २ कांदे
  • ३ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • ४ चमचे मोठे किसलेले खोबरे
  • १ लिंबू
  • १ चमचा साखर
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा मोहरी
  • २ मोठे चमचे तेल
  • पाव चमचा हळद
  • मीठ

कृती:

बटाटा पोहे

बटाटा पोहे

पोहे निवडून धूवून घ्या. असे करण्यासाठी एका गाळणीत पोहे ठेवा व वरून पाण्याची धार सोडा. दहा मिनिटा साठी एका बाजुला वाळत ठेवा. तेल गरम करा. त्यात हिंग, मोहरी टाका. नंतर बटाटा व कांदा टाका. झाकून पाच मिनिटे शिजू द्या. बटाटा नरम झाल्यावर कढी पत्ता व हिरवी मिरची चे तुकडे टाका. १-२ मिनिट हलवा. आता हळद आणि पोहे टाका. तीन-चार मिनिट हलवा उतरून घेण्या अगोदर साखर, मीठ व लिंबू पिळा, वरून कापलेली कोथिंबीर व खोबर्‍याचा किस पसरून टाका व गरम-गरम वाढा. बटाट्या ऐवजी हिरवे मटार, किंवा बटाटा व मटार वापरल्यास छान लागतात.