बटाटा वडी

साहित्य :

  • २५० ग्रॅम बटाटे
  • अडीच वाट्या साखर
  • १ मोठा चमचा ड्रिंकींग चॉकलेट
  • पाऊण वाटी तूप किंवा डालडा
  • अर्धी वाटी दूध
  • ४ वेलदोडे (पूड)
  • ५-७ काजूचे काप

कृती :

बटाटे उकडवे. सोलून गरम असतानाच किसणीवर किंवा पुरणयंत्रात घालून किसावे. दुधात ड्रिंकींग चॉकलेट मिसळून विरघलले की बटाट्यात घालावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात बटाटे व साखर एकत्र करून चुलीवर ठेवावे. मिश्रण सतत ढवळावे. मिश्रण घट्ट होऊ लागले की कडेने तूप सोडावे. जास्त घट्ट झाले की खाली उतरवावे व घोटावे. ४-५ मिनिटे घोटून तुपाचा हात फिरवलेल्या ताटात मिश्रण थापावे. वरून काजूचे पातळ काप भुरभुरीत व वाटीने अलगद दाबावे. निवाल्यानंतर वड्या कापाव्या.