बटाटा वेफर्स

साहित्य :

  • ८/१० मध्यम आकाराचे बटाटे अथवा साधारण अर्धा किलो
  • थोडे मीठ
  • चिमुटभर तुरटी
  • पाणी चार वाटी

कृती :

बटाटा वेफर्स

बटाटा वेफर्स

८/१० वेळा पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याची साले काढून घ्यावी. पुन्हा धुवा.वेफर्सच्या किसणीवर त्याच्या काचऱ्या करून त्या पाणी असलेल्या पातेल्यात टाका. तुरटीची पूड करून तिची गरम तव्यावर लाही करून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळत घाला. पाणी उकळू लागले की त्यात तुरटीची लाही व मीठ घाला. आता काचऱ्या पाण्यातून काढा. त्याचे पाणी दाबून काढा. या काचऱ्या उकळलेल्या पाण्यात घाला. झाल्याने हालवा. काचऱ्या वर येऊ लागल्या की त्या चाळणीत ठेवाव्यात त्यातील पाणी निथळून जाते. मग या काचऱ्या (काप) प्लॅस्टिकच्या कागदावर चांगले कडकडीत/खडखडीत वाळवून घ्यावेत. कधीही तळून खाऊ शकता. असे काप वर्षभरसुद्धा टिकू शकतात.