बटाटा नारळ वड्या

साहित्य :

  • १ नारळ
  • ५-६ मध्यम आकाराचे बटाटे
  • साखर
  • वेलदोड्याची पूड

कृती :

बटाटे उकडून साले काढून किसून घ्या. नारळाचे खोबरे खरडा. खोबरे मोजून घ्या.खोबऱ्याच्या निम्मी साखर, बटाट्याचा लगदा मोजा. याच्या निम्मी साखर घ्या. नंतर सर्व एकत्र करून गॅसवर ठेवा. मिश्रण घट्टसर होत आले की त्यात वेलदोड्याची पूड घाला. नंतर मिश्रण नरम, गोळीबंद झाली की उतरवून तूप लावलेल्या ताटात थापा. गार झाल्यावर वड्या कापा.