बटाट्याचा रस्सा

साहित्य :

  • अर्धी वाटी तूर डाळ
  • २ चमचे उडीद डाळ
  • ४-५ मध्यम आकाराचे बटाटे
  • आलं
  • कांदा
  • लसूण
  • आमचूर पावडर
  • ४-५ काळे मिरे
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • मीठ

कृती :

दोन्ही डाळी चांगल्या शिजवून घोटून घ्याव्यात. बटाटे उकडून त्याच्या मोठ्या फोडी करून घ्याव्यात. कढईत फोडणी करून आले, कांदा, लसूण व ४-५ हिरव्या मिरच्या वाटून घालाव्यात. थोडे गुलाबी परतल्यावर त्यात चिरलेले बटाटे घालावेत. भाजी चांगली परतावी व नंतर त्यात घोटून ठेवलेली डाळ घालावी. पाणी अंदाजे घालावे नंतर त्यात मीठ व आमचूर पावडर घालावी. रस्सा ५ मिनिटे उकळू द्यावा व नंतर खाली उतरवावा.