बटाट्याचे रायते

साहित्यः

  • १ मोठा उकडलेला बटाटा
  • २ कप ताजे दही
  • १ बारीक कापलेला कांदा
  • १/२ चमचे मीठ
  • १/४ चमचे वाटलेली धणे
  • १ हिरवी मिरची कापलेली
  • १ जुडी कोथंबीर कापलेली
  • १/२ चमचे जीरे भाजुन वाटलेले

कृतीः

उकडलेला बटाटा सोलून बारीक कापावा, दह्यात मीठ, धन्याची पावडर व जिरे टाकुन चांगल्या तर्‍हेने फेटावे, बटाटे व कांदा टाकुन मिळवावे, हिरवी मिरची व धणे वरून बुरकावे व जेवणाच्या टेबलावर सजवावे हे रायते विशेषतः पराठ्यांबरोबर स्वादिष्ट लागते.