बटाट्याची कढी

साहित्य:

  • २५० ग्रॅम बटाटा
  • १२५ ग्रॅम दही
  • १ वाटी बेसन (डाळीचे पीठ)
  • चवीप्रमाणे मीठ
  • हळ्द
  • धणे
  • लाल तिखट
  • आंबट पावडर
  • जीरे
  • तूप

कृती:

बटाट्याची कढी

बटाट्याची कढी

बटाटे उकडून चिरुन घ्या. तूप गरम करून जीरे व हळद टाका. धणे, लाल तिखट, टाकून परता.

बटाटे टाका व २ मिनीटे परता. मीठ व दही डाळीच्या पिठात टाकून, पाणी टाकून थोडा वेळ शिजू द्या.

ही कढी लवकर तयार होते.

अचानक पाहुणे आल्यास ही कढी पटकन करता येईल.