बेसन बहार

साहित्य :

 • २ वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ
 • ४ मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस
 • २ मोठे चमचे धने
 • २ मोठे चमचे तीळ
 • २ लवंगा
 • १ इंच दालचिनी
 • ५-७ मिऱ्याचे दाणे
 • १ चमचा जिरे
 • अर्धा चमचा हळद
 • १ चमचा लाल तिखट
 • दीड चमचा मीठ (जास्त लागू शकेल)
 • तळण्यासाठी तेल.

कृती :

पाव चमचा तेलात दालचिनी, मिरी, लवंगा व जिरे भाजून परतावे. खोबरे व तीळ वेगळेवेगळे बदामी रंगावर कोरडेच भाजावे. धने कोरडे भाजावे. हे सर्व जिन्नस एकत्र कुटून घ्यावेत व हा मसाला पिठात घालावा. मीठ, हळद व तिखट घालावे. सर्व मिश्रण वाटीने मापावे व तेवढेच पानी चुलीवर ठेवावे. उकळी आली की मोजलेले पीठ हळूहळू घालावे व उलथण्याच्या दांडीने सतत ढवळत राहावे. गुठळी राहू देऊ नये. सर्व पीठ घातल्यानंतर झाकण ठेवावे. तीनचार मिनिटे दणकून वाफ आणावी. खाली उतरवून तेलाचा हात लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये मिश्रण थापावे व चौकटी वड्या कपाव्या. गार झाल्यानंतर वड्या सुट्या कराव्या व कढईत ते आत तळाव्या. सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्याव्यात. हा वड्यांचा मसाला जास्त प्रमाणात केल्यास दोनतीन महिने टिकतो. मात्र कोरड्या, घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवावा.