भरलेले वांगे

साहित्य:

 • २५० ग्रा. छोटे वांगे
 • २ मिरच्या कापलेल्या
 • ४ पाकळी लसुण
 • २ कापलेले कांदे
 • १ तुकडा कापलेले आले
 • २ चमचे धणे
 • १/२ चमचा तिखट
 • १/२ चमचा जीरे
 • ३ मोठे चमचे तेल
 • १ जुडी कापलेली कोथंबीर
 • १/२ चमचा आमचूर
 • चवीनुसार मीठ

कृती:

वांग्याना धुवून मध्यभागी चिरावे, लसूण, कांदे, अदरक, धणे, हळद, मीठ व आमचूर मिक्सरमध्ये वाटलेल्या मसाल्यास बरोबर वांग्यात भरावे.
तेल गरम करून जीरे व हिरव्या मिरच्या तळाव्या. नंतर वांगे टाकावे आणि हलवावे.
आता झाकुन ठेवावे व झाकण्यात पाणी भरावे आणि ४-५ मिनीट कमी गॅसवर शिजवावे. वांगे शिजल्यानंतर कोथिंबीर टाकावी.