भारत बंदच्या घडामोडी

भारत बंदच्या घडामोडी

पेट्रोलच्या दरवाढीमुळे आणि वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या एनडीएने ३१ मे २०१२ रोजी भारत बंदची हाक दिली आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठाक घेतली. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्याचे संदेश या बैठकीत दिले गेले व कुठेही अनुचित प्रक्रार घडू देऊ नये, असेही त्यांना सुचविण्यात आले. जी ठिकाणे संवेदनशील आहेत तेथे पोलिस बंदोबस्त वाढवावा, पोलिस वाहने आवश्यक ठिकाणी उभी करावीत. आंदोलने, मोर्चा अशा प्रकारच्या नाजुक घटना योग्य पद्धतीने हाताळण्याचे सुचविण्यात आले. कुठल्याही प्रकारचा धक्का कायदा व सुव्यवस्थेला बसणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही दिल्या गेल्या.

एकीकडे मात्र मुंबई विद्यापीठाने आपल्या परीक्षेच्या वेळापत्रकात कुठलाही बदल न करता पूर्वनियोजित वेळापत्रका प्रमाणेच ३१ मे ला परीक्षा चालू राहतील, असे जाहीर केले. भारत बंदमुळे या दिवशी होणाऱ्या परीक्षांचे नेमके काय होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसहित पालकांना सतावत होता. या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई विद्यापीठाने परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच घेणार असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.