बिर्याणी

साहित्य:

  • १ कप तांदुळ
  • ३ कप उकळलेल्या भाज्या
  • ५ कांदा
  • १ कप घट्ट दही
  • ३ चमचे केशर
  • २ चमचे दूध
  • १ चमचा साखर
  • चवीनुसार मीठ
  • ६ टेबलस्पून तूप
  • तळण्यासाठी तूप

वाटण्याचा मसाला:

  • २ मोठे कांदे
  • ६ पाकळी लसूण
  • २ चमचे खसखस
  • २ चमचे शोप
  • १ इंच आले
  • ४ लाल मिरच्या
  • ४ हिरव्या मिरच्या
  • कडीपत्ता
  • लवंग
  • दालचिनी
  • ५ मिरे
  • २ टेबल स्पून किसलेले नारळ
  • १॥ चमचे जीरे
  • ३ चमचे धणे

 कृती:

बिर्याणी

बिर्याणी

तांदूळ मोकळे होईपर्यंत शिजवावे, तांदळात आणि भाजीत मीठ टाकावे.

एका कढईत कांदा लाल होईपर्यंत तळावा. कांदा काढून २ चमचे नारळाने दुध टाकावे आणि केसर टाकुन केसर मिसळेपर्यंत चाळावे.
यात भात मिळवून घ्यावा.

एका वेगळ्या भांड्यात २ चमचे तूप गरम करून वाटलेला मसाला ३-४ मिनीट भाजावा. थंड करून मीठ, दही व साखर टाकावी.

एका वेगळ्या भांड्यात ४ चमचे तूप टाकावे. तसेच थोडासा कांदा टाकावा. आता तांदुळ टाकावे. तसेच तांदुळावर थोडासा कांदा व वाटलेला मसाला टाकावा. त्यावर भाज्या पसरून घ्यावा.

उरलेला भात व कांदा टाकावा. वरून झाकुन द्यावे ४०० फॅ वर २५ मिनीट शिजवावे. वाढण्या अगोदर एका मोठ्या प्लेटमध्ये उलटे टाकावे. गरम गरम वाढावे.