ब्रेडची कचोरी

साहित्य :

  • स्लाईस ब्रेड
  • १ नारळ
  • १ १/२ कप साखर
  • ७-८ वेलदोडे
  • १/२ चमचा रोझ इसेन्स
  • थोडासा बेदाणा

कृती :

ब्रेडची कचोरी

ब्रेडची कचोरी

नारळ खवून साखर घालून त्याचे सारण तयार करुन घ्यावे व साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.

त्यात वेलची पूड, बेदाणा व रोझ इसेन्स घालून गार होऊ द्यावे.

ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकून हाताने दाबून पाणी काढून टाकावे.

नंतर वरील सारण १ चमचा घेवून ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून हाताने सर्व कडा जवळ आणून कचोरीसारखा गोल आकार द्यावा.

अशा सर्व कचोर्‍या तयार करुन ताटात ठेवाव्यात व अगदी आयत्या वेळी तळाव्यात.

फार सुंदर लागतात.