ब्रेडची रसमलाई

साहित्य:

  • अर्धा ब्रेड
  • अर्धा लीटर दूध ३ टेबलस्पून साखर (शीग लावून)
  • ३ वेलदोड्याची पूड
  • ५-६ चेरीज
  • थोडा बेदाना
  • तळण्यासाठी तूप,

कृती:

स्लाईसच्या कडा काढून त्याचे तुकडे करा तळून घ्या. दूध जरा आटवुन घ्या; त्यात साखर व वेलदोड्याची पूड घाला.नंतर त्यात तळलेली ब्रेड घाला व ५-१० मिनिटे त्यात मुरु द्या. शोभिवंत भांड्यात काढून वरुन चेरीजचे तुकडे व बेदाणा घालून सजवा. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा व वाढा.