बटर आइसिंग

साहित्य:

  • १ कप लोणी
  • पाऊण कप आइसिंग शुगर
  • १ लहान चमचा व्हॅनिला एसेंस

कृती:

बटर आइसिंग

बटर आइसिंग

एका भांड्यात लोणी, साखर व एसेंस मिसळून फेटावे व याला केक वर लावावे. केक मधून कापून त्यावर हे आइसिंग करता येते.

वरून केक सजावटीला पण हे आइसिंग उपयोगी आहे.

आइसिंगला नोजलमध्ये भरून सजावट करावी किंवा प्लास्टिक थैलीचा कोन करून त्यात भरून सजावट करावी.