बटर पनीर मसाला

साहित्य:

  • १०० ग्रा. पनीर
  • ५० ग्रा. दही
  • २५ ग्रा. काजू
  • कोथिंबीर
  • मिरची
  • ५० ग्रा. लोणी
  • कसुरी मेथी
  • २ कांदे

कृतीः

बटर पनीर मसाला

बटर पनीर मसाला

कांद्याला तळावे, पनीर तळावे, काजू दुधाने थोडे वाटून घेणे मग टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा.

एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी.

नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी.

वरून पनीर, दही व क्रीम टाकुन सजवावे.