केक डोनट

साहित्य :

  • ३ वाट्या मैदा
  • १ वाटी पिठीसाखर
  • २ टे. चमचा घट्ट डालडा
  • १ चमचा थोडी शीग लावून बेकींग पावडर
  • २ टे. चमचा दूध
  • १ अंडे
  • अर्धा चमचा मीठ
  • १ जायफळाचा छोटा तुकडा
  • ४ दालचिनीच्या काड्या
  • ४-५ वेलदोडे.

कृती :

जायफळ, दालचिनी व वेलदोडे यांची पूड करा. डालडा तूप फेसून घ्या.त्यात साखर घालून फेसा. नंतर त्यात अंडे घालून फेसा. त्यात मैदा, मीथ व वेलची पूड घाल. नंतर जरुरीप्रमाणे दूध घालून पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवा व जाडसर पोळी लाटून डोनट-कटरने कापा व बेताच्या विस्तवावर तळा. तळताना कढईत तूप भरपूर असावए. अंडे घातलेले असल्यामुळे कढईत पुरी टाकली की थोडा फेस आल्यासारखे होते.

जे लोक अंडी खात आहीत त्यांनी अंडे न घालता बेकींग पावडर जरा जास्त घालून करावे.