केक पुडिंग

साहित्य :

  • ६ वाटी केक
  • २ वाट्या दूध
  • चवीनुसार साखर
  • २ चमचे कस्टर्ड पावडर

सजवण्यासाठी :

  • टुटी फ्रुटी
  • सुका मेवा
  • चेरी

कृती :

केक पुडिंग

केक पुडिंग

एका चपट्या डब्यात केक कुस्करुन घ्या.

दुधात कस्टर्ड पावडर आणि साखर घाला. ते मिश्रण केकमध्ये मिक्स करा.

टुटी फ्रुटी, सुका मेवा, चेरीने सजवा.

नंतर डब्याला घट्ट झाकण लावून डीप फ्रिजमध्ये दोन ते अडीच तास सेट करण्यास ठेवा.

नंतर सुरीने वड्या पाडून सर्व्ह करा.