महाराष्ट्र सदन मध्ये इंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती साजरी

इंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती

इंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती

नवी दिल्ली : भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथील सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव बिपीन मलिक यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

श्री.मलिक यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व्यक्त केले. यावेळी अपर निवासी आयुक्त प्रदीप कुमार, व्यवस्थापक नितीन गायकवाड, माहिती अधिकारी अमरज्योत अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यांनीही यावेळी गुलाब पुष्प अर्पण करून इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.

बांग्‍लादेशाची निर्मिती,४२ वी घटना दुरूस्ती, बँकांचे राष्ट्रीयकरण, गरीबी हटाव योजना अशा महत्वपूर्ण घटना इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत घडल्या. त्यांच्या कार्याची महती अमरज्योत अरोरा यांनी यावेळी सांगितली.