चण्याचे सॅलड

साहित्य :

  • २ वाट्या शिजवलेले चणे ( काबुली)
  • अर्धी वाटी कोशिंबीर
  • अर्धी वाटी टोमॅटो
  • अर्धी वाटी काकडी ( कोचवलेली) २ मोठे चमचे व्हिनीगर
  • २ लिंबे (रस)
  • २ चमचे तेल
  • २-३ लसूण पाकळ्या
  • पाव चमचा मोहरीची ताजी पुड
  • चवीनुसार मीठ व मिरपूड

कृती :

१ वाटी काबुली चणे आदल्या रात्री भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी निथळून पाणी व मीठ घालून शिजवावेत. कोथिंबीर, टोमॅटो, काकडी व लसूण बारीक चिरावी ( लसूण नसला तरी चालेल) एका मोठ्या भांड्यात सर्व पदार्थ एकत्र करावेत व अलगद हालवावे.
परदेशात शिजलेले काबुली चणे डबाबंद मिळतात. हे डबे वापरण्यास सोयीस्कर आहेत. आपल्याकडे छोले हा एकच प्रकार चण्याचा केला जातो. बदल म्हणून हे सॅलड करून पहा. आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून वापरावी.