चटपटे पापड

साहित्य:

  • एक जुडी आंबट चुका
  • एक वाटी पातळ पोहे
  • एक इंच आले
  • एक चमचा जिरेपूड
  • एक चमचा धणेपूड
  • चार हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • तांदळाचे पीठ

कृती:

पोहे कोरडेच भाजा. गार झाल्यावर त्याची पावडर करा. चुका, मिरची, आलं मिक्सरमधून काढा. त्यात धनेपूड, जिरेपूड, मीठ, पातळ पोह्य़ाची पावडर घाला. आवश्यक तेवढे तांदळाचे पीठ घालून मळा व लाटून उन्हात सुकवावेत. तळल्यावर वरून चाट मसाला घाला.