चॉकलेट सरबत

साहित्य :

  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • पाव चमचा चॉकलेट रंग
  • अर्धा चमचा चॉकलेट इसेंस

कृती :

प्रथम १ किलो साखर घ्यावी. त्यात ४०० मिली. पाणी घालून अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे व ढवळून गॅसवर ठेवावे. मिश्रण ढवळत राहावे. १ उकळी येईपर्यंत ढवळावे. नंतर गॅस बंद करावा. गार झाल्यावर त्यात चॉकलेट रंग, चॉकलेट इसेंस घालून गाळून बाटलीत भरावे. सरबत देण्याचे वेळी पाव भाग तयार लिक्विड आणि पाऊण भाग दूध घालावे. एखादा बर्फाचा खडा टाकल्यास उत्तम.