मुख्यमंत्र्यांनी घेतले विठुरायाचे दर्शन

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सत्त्वशीला चव्हाण

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सत्त्वशीला यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची शासकीय षोडशोपचार महापूजा शनिवारी करण्यात आली. मुरलीधर फड आणि दीपाली फड हे दोघेही लातूर जिल्ह्यातील हकनकवाडी येथे राहतात व यावर्षी त्यांना मानाचे वारकरी होण्याचे भाग्य मिळाले. ‘मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या महापूजेत सामील होताना जीवन सार्थक झाले,’ अशी फड दाम्पत्याने भावना व्यक्त केली.