नारळाचे लाडू

साहित्य:

  • चार कप नारळ पावडर
  • ४ कप दूध
  • १ कप साखर

कृती:

नारळाचे लाडू

नारळाचे लाडू

एक कढईत दूध, साखर व तीन कप नारळाची पावडर टाका.

गॅस वर ठेऊन दूध आटे पर्यंत शिजवावे. गॅस बंद करून थंड करावे.

थंड झाल्यावर लाडू वळावे. उरलेल्या पावडर लाडवांवर चारी बाजूने लावावी.

५ मिनीट फ्रीजर मध्ये ठेऊन वाढावी.