गुलाब राजला आणि काटे तावडेला

राज ठाकरे आणि कॉन्स्टेबल प्रमोद तावडे

राज ठाकरे आणि कॉन्स्टेबल प्रमोद तावडे

वायरलेस युनिटमध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी राज ठाकरे यांचे भाषण संपताच व्यासपीठावर जाऊन गणवेशातच राज यांना कडक सलाम ठोकला आणि पिवळा गुलाब भेट दिला.

त्यांच्या पाठीवर थाप देत राज यांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर तावडे यांनी मनातील सल चॅनेलच्या प्रतिनिधींसमोर मांडून थेट पोलिस आयुक्तांनाच ‘टारगेट’ केले. तावडे यांनी खंत मांडली की, आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे दिसतो, असे म्हणून आयुक्त आपली खिल्ली उडवतात.

त्यानंतर तावडे यांना अपेक्षेप्रमाणे आझाद मैदान पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.