गायीचे दूध रुपयाने महाग

cow milk

गायीचे दूध रुपयाने महाग

गायीच्या दुधाच्या दरात एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय राज्यातील दूध उत्पादकांनी सोमवारी घेतला असून राज्यातील ग्राहकांना गायीच्या दुधासाठी आता प्रतिलिटर २६ रुपये मोजावे लागणार आहेत. विक्रीचा दर वाढविताना खरेदीच्या दरात मात्र वाढ केलेली नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. म्हशीच्या दुधाचे मात्र पूवीर्चेच दर कायम राहणार आहेत.

येत्या ११ जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. राज्यातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींची सोमवारी पुण्यात बैठक झाली. त्यानंतर महानंदचे अध्यक्ष विनायक पाटील, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामभाऊ टुले आणि एमडी विवेक क्षीरसागर यांनी दरवाढीची माहिती दिली. दुधाच्या खरेदीदरात मात्र या संस्थांनी वाढ केली नसून त्याबाबतचा निर्णय त्यांनी सरकारच्या कोर्टात टाकला आहे. खरेदीदरात वाढ करावी, या मागणीसाठी मंगळवारी या संस्थांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहेत.

राज्यात सुमारे एक कोटी लिटर इतके दुधाचे संकलन असून त्यापैकी ८० टक्के प्रमाण हे गायीच्या दुधाचे आहे. दरम्यान, म्हशीच्या दुधाच्या दरात गेल्याच वषीर् वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज या दरात वाढ करण्यात आलेली नसून पूवीर्चा ३३ रुपयांचा दर कायम राहणार आहे. यावेळी गोकुळ, वारणा, बारामती, कावरे, गोविंद, संगमनेर, थोरात, हुतात्मा, सोनाई,थोटे, गोदावरी अशा विविध दूध उत्पादकांचे ८० प्रतिनिधी उपस्थित होते.