डाळीच्या पिठाचे पिठले-१

साहित्य :

  • २ वाट्या डाळीचे पीठ
  • ४-५ हिरव्या मिरच्या किंवा तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • पाव वाटी तेल
  • फोडणीचे साहित्य
  • कांदा

कृती :

तेलात मोहरी, जिरे, हळद, कांदा घालून फोडणी करावी. त्यात ४ भांडी पाणी घालावे. त्यात लाल तिखट व मीठ घालावे. पाणी उकळायला लागल्यावर मंद आचेवर ठेवून हाताने थोडे थोडे डाळीचे पीठ घालावे व ढवळत राहावे, नाहीतर गुठळ्या होतात. उतरल्यावर कोथिंबीर घालावी.