देवाचे आवडते लोक

अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन हे दिसायला अगदीच सामान्य होते.

एकदा ते रस्त्याने जात असता, त्यांच्याकडे पाहून एक मनुष्य हळूच दुसऱ्याला म्हणाला, ‘लिंकन दिसायला अगदीच सामान्य आहेत नाही का?’ लिंकन यांच्या तिखट कानी ते शब्द जाताच, ते त्या गृहस्थाकडे वळून म्हणाले,

बाबा रे, मी दिसायला अगदीच सामान्य आहे, याचा अर्थ मी, परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे, असा आहे.’

‘ते कसे काय ?’ त्या गृहस्थानं विचारल ,

यावर लिंकन म्हणाले, ‘ बाबा रे, देवाला सामन्य रुपाची माणसेच अतिशय आवडतात म्हणून तर त्याने बहुसंख्य माणसे सामान्य रुपाची निर्माण केली आहेत.’

लिंकन यांच्या या अजब युक्तीवादाने थक्क झालेला तो माणूस त्यांना सलाम ठोकून तिथून निघून गेला.