देवतांना प्रिय असलेली सुक्ते

श्री भगवान विष्णू :पवमान, पुरूषसूक्त, विष्णू सुक्त
श्री भगवान शंकर :रूद्र, महिम्न, रूद्रसूक्त
श्री गणपती :बह्मणस्पति सूक्त, गणपत्यथर्वशीर्ष
श्री भगवान सुर्य :सौरसूक्त किंवा पुरूषसूक्त
श्री लक्ष्मी देवी :श्री सूक्त, लक्ष्मीसूक्त
श्री मल्हारी उर्फ खंडोबा :रूद्र, माहिम्न
श्री मारूती :रूद्र, माहिम्न
श्री दुर्गामाता भवानी :श्री सूक्त
श्री दत्तात्रेय :पवमान किंवा पुरूषसुक्त
श्री नरसिंह :पव्मान किंवा पुरूषसुक्त
श्री भगवान श्रीराम :पवमान किंवा पुरूषसुक्त
श्री भगवान श्रीकृष्णा :पवमान किंवा पुरूषसुक्त

अभिषेक या शब्दाचा अर्थ अभिषेकपात्रात जल म्हणजे पाणी घालून त्याची धार सतत देवावर धरणे. व्रतराज या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे वनगाईच्या शिंगातून शिवाला, शंखाने विष्णूला, ताम्रपत्रातून सूर्य व गणपती यांना तर स्वर्णपत्रातून श्री लक्ष्मी देवीला अभिषेक करावा.