साहित्य क्षेत्रात संमेलनाध्यक्षपदाची चर्चा

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर

साहित्य क्षेत्रात संमेलनाध्यक्षपदाची चर्चा रंगू लागली जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर करण्यात आले. एक ज्येष्ठ कवी, एक माजी कुलगुरु आणि कोकणातील एका लेखकाचा या चर्चेत समावेश आहे. मोर्चेबांधणीलाही यातील काही लेखकांनी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

आगामी साहित्य संमेलन चिपळून येथे होणार आहे. कार्यक्रमात होणारी संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक जाहीर झाली आहे. त्यासाठी नऊ ते १६ जुलै दरम्यान घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांमध्ये इच्छुक साहित्यिकांना अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लागणारी सर्व तयारी लेखकांनी आत्तापासूनच सुरु केली आहे.

२० जुलैपर्यंत घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांमध्ये केलेले अर्ज महामंडळाकडे येतील. उमेदवाराला सात दिवसांच्या कालावधीत आपले नाव मागे घेता येईल. २० जुलै रोजी अंतिम उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. सात सप्टेंबरपर्यंत सर्व मतदारांना मतपत्रिका पाठविल्या जातील. ३१ ऑक्टोबरपर्यंत मतदारांनी त्या मतपत्रिका निवडणुक अधिकाऱ्याकडे जमा कराव्यात. एक नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. १८ जूनला निवडणुकीची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली.