दिवस तुझे हे फुलायचे

दिवस तुझे हे फुलायचे । झोपाळ्यावाचून झुलायचे ॥धृ॥
स्व्प्नात गुंगत जाणे । वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे ॥१॥

मोजावी नभाची खोली । घालावी शपथ ओली
श्वासांत चांदणे भरायचे ॥२॥

थरारे कोवळी तार । सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायच ए॥३॥

माझ्या या घरापाशी । थांब तू गडे जराशी
पापण्या मिटुनी भुलायचे ॥४॥