आता डोमिसाइल सर्टिफिकेटची सक्ती नाही

सेतु

सेतु

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेटची सक्ती करण्यात आलेली नाही. ९ जानेवारीला काढलेल्या अधिसूचनेत तंत्रशिक्षण संचालनालयाने नमूद केले आहे की, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून डोमिसाइल सर्टिफिकेट लावणे आवश्यक होते. पण आता ते नसेल तर, जन्मतारखेचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (लीव्हिंग सर्टिफिकेट) सादर करता येईल. या अधिसूचनेत हे ही स्पष्ट करण्यात आले आहे की महाराष्ट्रात जन्म झाल्याचा स्पष्ट उल्लेख बर्थ आणि डोमिसाइल सर्टिफिकेटवर असणे जरुरीचे आहे. या सूचनेचा स्पष्ट उल्लेख इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी www.dte.org.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीपुस्तकाच्या पान क्रमांक १६ वर केला आहे. वेबसाईटवर या अधिसूचनेची प्रत आहे.

डोमिसाइल सर्टिफिकेटबरोबरच इतर आवश्यक कागदपत्रांच्या यादीमध्ये (राखीव गटांतील उमेदवारांकरता) जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांचाही संबंधित अधिसूचनेत समावेश आहे. या अधिसूचनेत हे ही म्हटले आहे की, इतर आवश्यक कागदपत्रांबरोबर ही कागदपत्रे प्रवेश अर्ज स्वीकृतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.