डोमकावळा आणि साप

एक भुकेलेला डोमकावळा भक्ष्याच्या शोधात असता, नदीकाठी बसलेला एक साप त्याने पाहिला. मग त्याने झडप घालून त्यास आपल्या चोचीत धरले आणि आता मारून खाणार, तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेढे घालून आणि त्याच्या मानेस दंश करून त्याचा तत्काळ प्राण घेतला. मरतेवेळी तो डोमकावळा म्हणाला, ‘दुसऱ्यास मारून स्वतःची क्षुधा शांत करू इच्छिणारास हे पारिपत्य सर्वस्वी योग्य आहे.’

तात्पर्य:- जो पदार्थ आपणास मिळविता येणे शक्य नाही आणि मिळाला तरी पचन होणे शक्य नाही, तो पदार्थ अधाशीपणाने खाऊ जाणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे होय.