डबल का मीठा हलवा

साहित्य :

  • १ मोठा ब्रेड
  • ४-५ मोठे चमचे तूप
  • दीड वाटी साखर
  • ३ कप दूध
  • १ वाटी खवा(सुमारे २०० ग्रॅम)
  • १ वाटी ताजी घोटलेली साय
  • ४-५ वेलदोडे पूड
  • ५-७ काजू
  • बदामाचे पातळ काप
  • १ चमचा बेदाणा

कृती :

डबल का मीठा हलवा

डबल का मीठा हलवा

ब्रेडच्या बदामी कडा काढून टाकाव्या. मधल्या भागाचे लहान चौकोनी तुकडे करावे. काही मंडळींना कडा काढलेल्या आवडत नाहीत तेव्हा त्या व काढता तुकडे चिरावे. यामुळे हळव्याचा रंग निराळा होतो पण चव जास्त खमंग येते.

ब्रेडाचे तुकडे तुपात चुरचुरीत तळावे. दुधात साखर घालून दूध तापवावे. त्यात तळलेले ब्रेडचे तुकडे घालावे. मंद उकळू द्यावे.

खवा कुस्करून घालावा. मिश्रण हलक्या हाताने ढवळावे. ४-५ मिनिटे चुलीवर मिश्रण ठेवावे. आंच अगदी कमी असू द्यावी. खाली उतरवून सुबकशा वाढायच्या भांड्यात ओतावे.

त्यात बेदाणे, इतर मेवा, वेलचीपूड घालावी. वरून साय घालून खायला द्यावा.ब्रेडला पूर्वी डबलरोटी म्हणत असत. त्यामुळे या पदार्थाला डबल का मीठा हे नाव आले

मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पार्टीसाठी हा गोड पदार्थ करायला सोपा व स्वदिष्ट आहे.