डॉ. कलाम यांची माघार

डॉ. अब्दुल कलाम

डॉ. अब्दुल कलाम

‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांच्या जेव्हा लक्षात आले की, मुखर्जी यांना बसपबरोबरच समाजवादी पक्षही पाठिंबा देत आहे तेव्हा त्यांनी या निवडणूकीच्या आखाड्यावरुन माघार घेतली. ‘निवडणूक तेव्हाच लढवू जेव्हा साठ टक्क्यांची खात्री असेल, असे त्यांनी स्पष्टपणे ममता आणि मुलायम यांना सांगितले होते. पण आता एनडीएने पाठिंबा देऊनही मतांची संख्या फक्त चाळीस टक्क्यांपर्यंतच पोहोचत आहे. त्यामुळे निवडणूकीच्या फंदात न पडलेलेच बरे, असा निर्णय त्यांनी घेतला आहे,’ कलामांच्या जवळच्या सूत्रांनी असे सांगितले आहे.